Alphonso Mango Price Pudhari
मुंबई

Alphonso Mango Price: अक्षय्य तृतीयेसाठी मुंबईत हापूसच्या 3 लाखांवर पेट्या

सध्या बाजारात उपलब्ध असलेला कोकण हापूस 800 ते 1800 रूपये डझन आणि कर्नाटक हापूस कोकण हापूसच्या नावाने 750 रूपये डझन दराने विकला जात आहे.

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीया सणासाठी मुंबईसह उपनगरात तीन ते साडेतीन लाख पिकलेल्या तयार हापूस आंब्याच्या पेट्या व्यापाऱ्यांनी किरकोळ बाजारात विक्रीसाठी आणल्या असून हा हापूस 800 ते 1800 रूपये डझन या दराने विकला जात आहे.

सध्या बाजारात उपलब्ध असलेला कोकण हापूस 800 ते 1800 रूपये डझन आणि कर्नाटक हापूस कोकण हापूसच्या नावाने 750 रूपये डझन दराने विकला जात आहे.

गेल्या आठवड्यापासून मुंबई एपीएमसीत दररोज कोकण हापूसच्या सरासरी 50 ते 52 हजार पेट्यांची तर परराज्यातील हापूसचे 25 ते 28 हजार क्रेटची आवक सुरु आहे. अक्षय्य तृतीयेसाठी पंधरा दिवस आधीच किरकोळ व्यापारी घाऊक बाजारातून हापूसची खरेदी करुन मोकळे झाले.

खरेदी केलेल्या हापूसला पिकविण्यासाठी साधारणत: आठ ते बारा दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे 1 ते 8 एप्रिलपर्यंत खरेदी केलेला सुमारे 3 ते साडेतीन लाख हापूसच्या पेट्या गेल्या तीन दिवसांपासून बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

प्रतवारीनुसार कोकण हापूसचे दर (रुपये डझन)

  • मोठ्या आकाराचा आंबा - 1200 ते 1800

  • मध्यम आकाराचा आंबा - 800 ते 1600

  • लहान आकाराचा माल - 400 ते 800

  • डागी हापूस - 400 ते 600

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT