सिंदेवाही तालुक्यात नदीत बुडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू File Photo
मुंबई

Aksa Beach drowning : १३ वर्षीय मुलाचा आकसा समुद्रात बुडून मृत्यु

घटनेनंतर परिसरात हळहळ

पुढारी वृत्तसेवा

मालाड : मालाड पश्चिमेतील येथील पटेलवाडी, आकसा समुद्र किनाऱ्यावर आयएनएस हमला या दिशेला असलेल्या समुद्रकिनारी सोमवारी (दि. २१ ऑक्टोबर) संध्याकाळी दुर्दैवी घटनेत मयांक ढोल्या (वय १३ वर्षे) हा मुलगा समुद्रात पोहत असताना बुडून मृत झाला.

माहितीनुसार, मयांक आणि त्याचे मित्र रोज या ठिकाणी पोहायला जात असत. संबंधित ठिकाणी पाण्यात उतरण्यास सक्त मनाई असूनही ही मुलं दररोज तेथे पोहत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. जीवरक्षक जवळ आल्यावर ही मुलं जे जे नरसिंग होम जवळील झाडीत लपतात आणि जीवरक्षक निघून गेल्यावर पुन्हा पाण्यात उतरतात, अशीही माहिती समोर आली आहे.

संध्याकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास मयांक बुडाल्याचे समजताच स्थानिकांनी तातडीने पोलीस व अग्निशमन दलाला पाचारण केले. शोधमोहीम अंधार पडल्याने साडेसात वाजता थांबवण्यात आली. रात्री सुमारे १० वाजता मयांकचा मृतदेह सापडला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस आणि अग्निशमन दल पुढील तपास करीत आहेत .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT