Ajit Pawar Memorial Pudhari
मुंबई

Ajit Pawar Memorial: अजित पवार विमान अपघात प्रकरणी पारदर्शक तपासाची मागणी; रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांशी भेट

देवेंद्र फडणवीस यांना निवेदन; स्मारक उभारणी व मृतांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अपघातातील तांत्रिक विषय, अजित पवार यांचे देवगिरी येथे स्मारक उभारणे आणि विमानात मृत्युमुखी

पडलेल्या इतरांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांचे पत्र पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. या अपघाताचा तपास करताना संपूर्ण पारदर्शकता राखली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे पवार यांनी सांगितले.

या भेटीत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची तांत्रिक तसेच फौजदारी अनुषंगाने तपास व्हावा यासाठी कालबद्ध चौकशीचे आदेश द्यावा आणि गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. व्हीएसआर कंपनीची सेवा तत्काळ स्थगित करावी, विधिमंडळ आवारात

अजितदादांचे स्मारक तयार करावे. बारामती विमानतळ सुसज्ज करून त्याला अजितदादांचे नाव द्यावे. पुणे रिंग रोड, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, पुणे-शिक्रापूर एलिव्हेटेड रस्ता यांना अजितदादांचे नाव द्यावे. तसेच अपघातात निधन झालेल्या विदीप जाधव, पिंकी माळी, शांभवी पाठक यांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशा मागण्या केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT