Ajit Pawar Plane Crash Black Box: अजित पवार यांचा विमान अपघात झाला त्यावेळी विमानात नेमकं काय घडलं याबाबतची स्पष्ट माहिती समोर येत नाहीये. दरम्यान एका अधिकाऱ्याने सांगितले की विमानातील दोन कॉकपीट क्रू मेंबर हे ओह.. शि** असं म्हणटल्याचं ऐकू आलं.
या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. यात अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक, दोन कॉकपीट क्रू पायलट इन कमांड सुमित कपूर आणि सहवैमानिक शांभवी पाठक यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिचा देखील मृत्यू झाला.
हे विमान दिल्लीतील VSR Ventures Pvt Ltd या कंपनीचं होतं. दरम्यान, घटना घडली त्यावेळी नेमकं काय झालं होतं हे सांगताना डीजीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'क्रू कडून शेवटचे शब्द हे ओह शि** ऐकू आले होते.
तो अधिकारी पुढे म्हणाला की, बारामती विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल हे पायलट कॅडेट्स कडून सांभाळलं जातं. यात शहरातील रेडबर्ड एव्हिएशन आणि कार्व्हर एव्हिएशन या दोन खासगी एव्हिएशन अकादमींचा समावेश आहे.
दरम्यान, एअरक्राफ्ट अॅक्सिडेन्ट इनवेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या अधिकाऱ्यांनी क्रॅश साईटला भेट दिली असून त्यांनी फॉरेन्सिक तपास करण्याचं काम सायंकाळपासून सुरू केलं आहे.
दुसरीकडे आज (दि. २९ जानेवारी) नागरी उड्डाण मंत्रालयानं एक वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे. त्यावेळी त्यांनी विमानातील ब्लॅक बॉक्स मिळाल्याची माहिती दिली. मंत्रालयाने एक्सवर पोस्ट केली की, 'या प्लेन क्रॅशचा संपूर्ण निष्पक्ष आणि कालमर्यादा घालून तपास केला जाईल. या तपासाला विशेष प्राथमिकता दिली जाईल.'
या ट्विटमध्ये AAIB नवी दिल्लीच्या तीन अधिकाऱ्यांची टीम आणि डीजीसीएच्या ३ अधिकाऱ्यांची टीम क्रॅश साईटवर २८ जानेवारी रोजीच पोहचली आहे. AAIB चे संचालक देखील साईटवर पोहचले असून तपास वेगानं केला जात आहे. दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषातून ब्लॅक बॉक्स शोधून काढण्यात आला आहे.