Sunetra Pawar  Pudhari
मुंबई

Maharashtra politics: अजित पवार गटाचे २२ आमदार फुटणार! राष्ट्रवादीत पुन्हा मोठी खळबळ! सुनेत्रा पवारांचे आमदारांना तातडीने फोन

अजितदादा गटाचे २० ते २२ आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे. या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पहा सविस्तर बातमी...

मोहन कारंडे

Maharashtra politics

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. अजित पवार गटाचे तब्बल २० ते २२ आमदार पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत असून, ते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठी चलबिचल सुरू झाली असून, पक्षातील स्थिती पाहता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून थेट आमदारांना फोन करून त्यांची विलीनीकरणाबाबत मते जाणून घेण्यास सुरुवात झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं?

गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटाचे २२ आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. "अजित पवारांचे नेतृत्व आता राहिले नाही. त्यामुळे त्या गटाच्या नेत्यांना गुलामगिरी करावी लागत आहे. त्यांना स्वाभिमान गहाण ठेवावा लागत आहे. हा गट सुनेत्रा पवारांचा म्हणजे अमित शहा यांचा पक्ष आहे. हा भाजपचा आहे, असे राऊत म्हणाले होते.

संजय राऊतांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाकडून तात्काळ आमदारांना थेट फोन करून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. पक्षाच्या विलीनीकरणावर आमदारांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवार यांच्याकडून केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT