मुंबई : आदिवासी युवकांची आज दादर टिळक भवन काँग्रेस कार्यालय येथे पोलिसांबरोबर संघर्ष झाला, आदिवासी युवक हे कालपासून काँग्रेस कार्यालय टिळक भवन दादर येथे वास्तव्यास आहेत, लोकभवन येथे त्यांचे मोर्चाचे नियोजन होते. pudhari photo
मुंबई

Tribal Students Mumbai Protest : आम्ही पुन्हा येऊ; इशारा देत गेले आदिवासी विद्यार्थी

परवानगी नाकारून पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मुंबईबाहेर पाठवले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : टिळक भवनमधील धरपकडीनंतरही आदिवासी विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा निर्धार कायम असून, मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील. परवानगी घेऊन २५ ऑक्टोबरला मोठ्या संख्येने मुंबईत पुन्हा धडक देऊ, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.

आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी द्यावी अथवा राज्यपालांची भेट घेण्याची संधी द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मात्र, परवानगी नाकारून पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मुंबईबाहेर पाठवले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

विद्यार्थी प्रतिनिधी विनेश वडे यांनी पुढारी प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले की, सरकारला यापूर्वीच आंदोलनाची पुढील दिशा कळविली होती. परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा मुंबईत आंदोलन करू, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही मागण्यांवर ठोस निर्णय झाला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी कायम आहे.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना पुन्हा ई-मेल करू. २५ ऑक्टोबरला मोठ्या संख्येने मुंबईत येण्याची आमची तयारी आहेे. आंदोलक किरण पावरा यांनी पोलिसांच्या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, आम्ही आठ दिवस पायी चालत आलो. आमचे पाय सुजले आहेत. आम्ही शिक्षणासाठी, आमच्या हक्कांसाठी येथे आलो. आमच्याशी चर्चा करण्याऐवजी पोलिसांनी आम्हाला मुंबईबाहेर घालवणे योग्य आहे का?

  • विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मुख्य मागणी आहे.

  • आश्रमशाळांमधील मूलभूत सुविधा, पिण्याचे पाणी, दर्जेदार भोजन, वसतिगृहांतील सुविधा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न, प्रलंबित शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे मिळण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या.

  • विद्यार्थ्यांनी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूंची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT