Aditya Thackeray Pudhari
मुंबई

Aditya Thackeray: कर्जतमधील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरे आक्रमक! टोरंट पॉवर प्रकल्पावर सरकारला सवाल

सायडोंगर परिसरातील जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून राज्य सरकार आणि वन विभागाला जाब; पर्यावरणाच्या नुकसानीबाबत ठाकरे यांचे आरोप

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: 'टोरंट पॉवर' कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी कर्जत येथे सुरु असलेल्या वृक्षतोडीला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विरोध केला आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 'सायडोंगर' परिसरात 'टोरंट पॉवर' कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी वृक्षतोड सुरु आहे.

स्थानिकांचा विरोध असताना वन विभागाने वृक्षतोडीला परवानगी परवानगी कोणाच्या आशीर्वादाने दिली, गुजरातच्या कंपनीच्या फायद्यासाठी महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असे सवाल आदित्य यांनी उपस्थित केले आहेत.

सोशल मीडिया 'एक्स'वर पोस्ट करत त्यांनी या प्रकल्पावरून थेट राज्य सरकार आणि वन विभागाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलेले प्रश्न

  • समृद्ध निसर्ग संपवून, स्थानिकांच्या आणि पर्यावरणप्रेमींच्या विरोधाला पायदळी तुडवून ही कत्तल कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?

  • स्थानिकांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा तीव्र विरोध असताना ह्या बेसुमार वृक्षतोडीची परवानगी वन विभागाने नेमकी कोणाच्या दबावाखाली दिली?

  • महाराष्ट्राचा निसर्ग ओरबाडून खाजगी कंपन्यांचे खिसे भरण्याचा हा अजेंडा कधी थांबणार?

  • नोव्हेंबरला होणाऱ्या भूमिपूजनाच्या घाईकरिता, महाराष्ट्राच्या पर्यावरणाचा बळी का दिला जातोय?

  • बिल्डर मित्र आणि मालकांचे खिसे भरताना ह्या राजवटीला महाराष्ट्राचे नुकसान दिसत नाही का?

  • राज्यात दुष्काळ आहे आणि त्यात जंगल कापून महाराष्ट्राला वाळवंट बनवण्याचा प्रयत्न भाजप राजवटीने हाती घेतला आहे, असा आरोपही आदित्य यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT