Aaple Sarkar portal down Pudhari
मुंबई

‌Aaple Sarkar portal down : ‘आपले सरकार‌’ वेब पोर्टलवर बिघाड

दाखले खोळंबले : सेतू सेवा केंद्रांना फटका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्य शासनाचे अधिकृत वेब पोर्टल आणि मोबाईल ॲप असलेल्या ‌‘आपले सरकार‌’ वर गेल्या चार दिवसांपासून तांत्रिक बिघाड सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना एकाच व्यासपीठावरून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणारे विविध दाखले खोळंबले आहेत. त्याचा मोठा फटका सेतू सेवा केंद्रांना बसला आहे.

उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सेतू सुविधा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय दाखले उपलब्ध करून देण्यासाठी अनेक ठिकाणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. या शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.

मात्र, गेल्या चार दिवसांपासून आपले सरकार वेब पोर्टलवर तांत्रिक बिघाड आहे. त्यामुळे सेतू केंद्राने अर्ज प्रकिया पूर्ण करूनसुद्धा विविध अर्ज खोळंबून पडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अर्ज आणि पैसे भरूनही मोबाईल, व्हॉट्सॲप किंवा प्रत्यक्ष दाखले मिळालेले नाहीत.

तांत्रिक बिघाडीमुळे अर्ज उपलब्ध होत नाहीत

यासंदर्भात सेतू सेवा केंद्राकडे संपर्क साधला असता आम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र आपले सरकार पोर्टल वरील तांत्रिक बिघाडीमुळे अर्ज उपलब्ध होत नसल्याचे अंधेरी येथील सेतू सेवा केंद्राचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT