आदित्य ठाकरे file photo
मुंबई

Shiv Sena UBT MP dissatisfaction : खासदारांच्या अस्वस्थतेवर आदित्य ठाकरेंचे मौन

ट्रम्पचे खासदारही असतात त्यांच्या संपर्कात; लगावला टोला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : उद्धव सेनेचे खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चेला उत्तर देणे आदित्य ठाकरे यांनी टाळले. पक्ष बैठकीत खासदारांकडून नाराजीचा सूर आळवलेला असतानाच आदित्य यांनी मात्र खासदार अस्वस्थ असल्याच्या बातम्या वावड्या आहेत, असे नमूद केले.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्धव सेनेचे खासदार फोडण्यासाठी ‌‘ऑपरेशन टायगर‌’ राबविले जात आहे. त्यासाठी दोन आठवड्यापूर्वी शिंदे यांनी दिल्ली दौरा केला. मात्र, ही कुणकुण लागताच उद्धवनी आपल्या खासदारांची गेल्या रविवारी ‌‘मातोश्री‌’वर बैठक बोलावली होती. याच बैठकीत खासदारांनी आदित्य यांच्यावर नाराजी व्यक्त केली, असे म्हणतात.

आदित्य यांनी राज्यभरात फिरायला हवे होते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याबद्दलचा प्रश्न आदित्य ठाकरेंनी टोलावला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि ठाकरेंच्या सेनेचे खासदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. या प्रश्नावर आदित्य म्हणाले, ट्रम्प आणि स्टार्मर यांचेही खासदार त्यांच्या संपर्कात आहेत. कुणाचे खासदार फुटणार आहेत, याची जगभरात 33 देशांत चर्चा आहे!

केसरकरांचा दावा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील याची मला खात्री आहे, असा दावा शिंदे सेनेचे नेते आमदार दीपक केसरकर यांनी शनिवारी केला. यापूर्वी ठाकरे सेनेतून अनेक लोक मूळ शिवसेनेकडे आले आहेत. तसाच प्रकार पुन्हा एकदा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगत केसरकरांनी ऑपरेशन टायगरला दुजोराच दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT