Aaditya Thackeray on BMC election Voting
निवडणूक आयोगाने १,८०,००० मतदार कापल्याचे आमच्या डेटामध्ये आले आहे. मतदानाच्या नावाखाली अशा प्रकारे नागरिकांना वेठीस धरले जात आहे. त्यांचा संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकारच हिरावून घेतला जात असेल तर मग घटनात्मक संस्था कशी?, असा सवालही करत मुंबईत काही ठिकाणी निवडणूक अधिकारी देखील भाजपचा प्रचार करत आहेत. आमचे उमेदवार सचिन पाटील यांनी अशा अधिकाऱ्यांना पकडले देखील आहे. मतदान अधिकारी यांच्या फोनवर भाजपचे मेसेजेस मदत करत होते, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.
मुंबईमध्ये गणेश नाईकांना मतदान करण्यासाठी एक तास फिरावं लागलं. निवडणूक आयोगाचा हा चुकीचा कारभार समोर आला. वर्षानुवर्षे गणेश नाईक जिथे मतदान करतात ते न करता थेट वाशीला जावं लागलं. त्यांच्यामध्ये मी दोन-चार रील्स पाहिल्या होत्या; त्यांचं मन व्यक्त करत असताना आणि मला खात्री आहे की त्यांच्या मनात आहे ते करून दाखवतील. अनेक असे मतदार आहेत ज्यांना मतदानाची रिसीट मिळाली, मात्र मतदान यादीमध्ये तिथे पोहोचल्यानंतर नाव नाही. अनेकांची नावं जी आहेत ती स्कॅन केल्यानंतर पंधरा-पंधरा नावं दिसून येतात, असं देखील दिसलं. काही ठिकाणी हे पण दिसलं ना की, पुरुषाचं नाव आणि महिलेचा चेहरा, हे पण दिसलंय. म्हणजे मी पाहिलं काका, त्यांचा व्हिडिओ आलाय; ते गेले मतदानाला आणि महिलेचा चेहरा होता म्हणून त्यांना मतदान नाही करू दिलं.
जिकडे दुबार मतदार आहेत तिकडे आता अॅफिडेव्हिट पण करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना कुठेतरी मतदान करायला देखील उशीर होत आहे. हे मी पहिल्यापासून बोलत होतो. आपल्याला आठवत असेल, हे हमीपत्र जे आहे ते पहिल्यांदा आलंय आणि आम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये तेच बोललो की, हमीपत्र भरायला किती वेळ लागणार आहे सगळीकडे. म्हणजे एकंदर निवडणूक ही त्यांनी क्लास मॉनिटरची निवडणूक असेल असं घेण्याचा प्रयत्न केलाय, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावा.