आजाराने त्रस्त युवकाने गळफास घेवून संपवले जीवन File Photo
मुंबई

बायपोलर डिसऑर्डर आजाराने त्रस्त तरूणाने संपवले जीवन

डोंबिवली येथील 19 वर्षीय तरुणाचे टोकाचे पाऊस उचलत संपवले जीवन

करण शिंदे

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली येथे गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे. प्रज्वल सुधीर महाजन (19, रा. हरीओम पूजा सोसायटी, डोंबिवली-पश्चिम) असे मृत तरूणाचे नाव आहे. या तरुणाला बायपोलर डिसऑर्डर या मानसिक आजाराने ग्रासले होते.

पश्चिम डोंबिवलीतील प्रज्वल महाजन या 19 वर्षीय तरूणाचा मृतदेह राहत्या घरातील सीलिंग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत लटकताना आढळून आला. त्याची आई मनीषा महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णूनगर पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्वल महाजन याला करोना महासाथीनंतर बायपोलर डिसऑर्डर हा मानसिक आजार जडला होता.

कल्याणच्या मनोदय रूग्णालयाचे मानसोपचार तज्ञ डॉ. धर्माधिकारी आणि मुंबईतील जे. जे. रूग्णालयात असलेल्या मनोविकार विभागातील मानसोपचार डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू होते. सततच्या अस्वस्थतेमुळे प्रज्वल मला आता मला मरायचे आहे, माझे आता वय झाले आहे, जगण्यात आता काही अर्थ उरला नाही, त्यामुळे मला आत्महत्या करायची आहे, असे वारंवार म्हणायचा. त्यामुळे पालक प्रज्वलची अधिक काळजी घेत होते. त्याला कधीही एकटा घरात, बाहेर सोडत नव्हते. वैद्यकीय उपचार सुरू ठेऊन तो ग्रासलेल्या आजारातून बाहेर येईल, अशी आशा पालकांना होती.

शनिवारी रात्री आठच्या सुमारास प्रज्वल नेहमीप्रमाणे मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागला. त्याने बेडरूममध्ये जाऊन दरवाजाची कडी लावून घेतली. ओढणीच्या साह्याने सीलिंग फॅनला गळफास घेऊन जीवन संपवले. पालकांनी दरवाजा उघडण्यासाठी प्रज्वलला बाहेरून आवाज दिला, दार ठोठावले, तथापी त्याने आतून काहीच प्रतिसाद दिला नाही. अखेर दरवाजाची आतील कडी तोडल्यानंतर गळफास घेतलेल्या प्रज्वलला खाली उतरवून तात्काळ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात हलविले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT