बापाकडून मुलीवर लैगिंक अत्याचार Pudhari File Photo
मुंबई

संतापजनक! पत्नीला दारु पाजून नराधम बापाचा मुलीवर लैंगिक अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच जन्मदात्या पित्याने लैगिंक अत्याचार केल्याची संतापजनक घटना मालाड, मालवणी परिसरात घडली. पत्नीला दारु पाजून तिला झोपवून ठेवले आणि स्वत:च्या मुलीला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पिडीत मुलीच्या मावशीने दिलेल्या तक्रारीवरुन मालवणी पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेला आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

ही घटना २७ जुलैला रात्री दहाच्या सुमारास घडली. तक्रारदार महिला बोरिवली परिसरात राहते. तिची बहिण मालाडच्या मालवणी परिसरात पती आणि तेरा वर्षांच्या मुलीसोबत राहाते. २७ जुलैला या नराधम बापाने आधी पत्नीला जबरदस्तीने दारू पाजून झोपवून ठेवले. दारुच्या नशेत ती झोपल्याचे लक्षात येताच त्याने स्वतःच्या तेरा वर्षांच्या मुलीशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. तिने विरोध केल्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैगिंक अत्याचार केला.

जिवाच्या भीतीने अल्पवयीन मुलीने हा प्रकार सुरुवातीला कोणालाही सांगितला नाही. दोन दिवसांपूर्वी मुलीने आपल्या मावशीला घडलेला प्रकार सांगितला. आपल्याला वडिलांची भीती वाटत असल्याचेही तिने सांगितले. ही माहिती ऐकून मावशीला प्रचंड मानसिक धक्का बसला. तिने मालवणी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला आणि पिडीत मुलीच्या पित्याविरुद्ध तक्रार केली.

या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पिता पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT