मुंबई

मुंबई : फुकट्या २० लाख रेल्वे प्रवाशांकडून ९ महिन्यात १३५ कोटींचा दंड वसूल

अविनाश सुतार

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : पश्चिम रेल्वेने एप्रिल ते डिसेंबर या ९ महिन्याच्या कालावधीत विना तिकिट प्रवाशांकडून तब्बल १३५ कोटी ५८ लाखांचा दंड वसूल केला आहे. या कालावधीत तब्बल २० लाख १२ हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. तिकिट खिडक्यांवरील रांगेत उभे राहण्याचा कंटाळा, वेळेची बचत करण्यासाठी, गडबड अशा विविध कारणांमुळे प्रवासी तिकिट न काढता लोकलने प्रवास करतात. अशा प्रवाशांवर रेल्वेचे तिकिट तपासनीस दंडात्मक कारवाई करतात.

डिसेंबर महिन्यात १ लाख ५८ विनातिकिट प्रवाशांवर कारवाई करुन त्यांना ९ कोटी ८७ लाखांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. एसी लोकलमधून विना तिकिट प्रवास करणाऱ्या ३१ हजार ५०० जणांना पकडण्यात आले.

टीसी जाहिद के. कुरेशी यांच्याकडून एक कोटीचा दंड वसूल

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील जाहिद के कुरेशी (उपमुख्य तिकीट निरीक्षक) यांनी गेल्या वर्षभऱात १३ हजार फुकट्य़ा प्रवाशांना पकडून तब्बल एक कोटीपेक्षा अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या ११ हजार ६८४ जणांकडून आणि १ हजार ४३२ अनियमित प्रवाशांवर कारवाई केली आहे.

माझे वडील सुद्धा पश्चिम रेल्वेत टीसी म्हणून कार्यरत होते. ते विभागीय मुख्य तिकीट निरीक्षक (ग्रँट रोड, मुंबई विभाग) म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना रेल्वे मंत्रालयाचे आणि महाव्यवस्थापक व पीसीसीएम पुरस्कारही मिळाले. वडिलांमुळे मला व माझ्या भावांना भारतीय रेल्वेत टीसी म्हणून काम करण्याची प्रेरणा मिळाली. आम्ही चार भावडांनी १९९५ मध्ये रेल्वे भरती बोर्ड परीक्षा दिली. त्यात आम्ही उत्तीर्ण झालो. आम्ही तीन भाऊ पश्चिम रेल्वेत टीसी म्हणून तर एक जण सहायक लगेज क्लर्क म्हणून रुजू झाला आहे. जाहिद यांना पाचवेळा मुंबई मध्य विभागाचा 'man of the month' हा पुरस्कारही मिळालेला आहे.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT