केज ; पुढारी वृत्तसेवा केज तालुक्यातील साळेगांव येथील एका सामान्य कुटुंबातील युवकाची पोलीस भरतीत निवड झाली. या आनंदात त्याच्या मित्रांनी डीजेच्या तालावर गावातून मित्राची घोड्यावरून मिरवणूक काढून आनंद साजरा केला.
या विषयी अधिक माहिती अशी की, साळेगांव केज येथील उत्तरेश्वर राऊत हा गरीब कुटुंबातील असून, सर्वसामान्य कुटुंबात असलेल्या उत्तरेश्वर राऊत याने प्रचंड मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर परभणी पोलीस भरतीत यश संपादन केले. त्याच्या यशाबद्दल केदारेश्वर प्रतिष्ठाण यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. गावातून त्यांची डीजेच्या ठेक्यावर घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी सरपंच कैलास जाधव, रावसाहेब बचुटे, सदस्य रमेश इंगळे, पोलीस जमादार राजू गुंजाळ व जोगदंड, संभाजी सरवदे, ज्योतिराम बचुटे, बालाजी बचुटे, शेख जावेद, बालाजी नन्नवरे, रवी इंगळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा :