नांदेड; पुढारी वृत्तसेवा : बिलोली तालुक्यातील चिटमोगरा येथील महिला शेतात मजुरी करून गावाकडे परत येत असताना आज, शुक्रवारी (दि.१४ ऑक्टोबर) साडेचारच्या सुमारास श्री खंडोबा मंदिर शेजारी अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू झाला.
सगळीकडे परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून १४ ऑक्टोबर रोजी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, चीटमोगरा (ता.बिलोली) येथील हुलूबाई लक्ष्मण काळेकर (वय ४५) ही महिला शेतीत मजोरी करून गुरांसाठी चाऱ्याचा डोक्यावर भारा घेऊन येत असताना खंडोबा मंदिर शेजारी आंगावर वीज पडून मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, दोन मुले असा परिवार आहे.
हेही वाचा;