मराठवाडा

परळीतील ‘वैद्यनाथ मंदिर’ आरडीएक्सने उडविण्याची पत्राद्वारे धमकी; दोघे ताब्यात

backup backup

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा

बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथ देवल समितीचे विश्वस्त यांना आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाट देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे. मला तातडीची गरज भागविण्यासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच दिलेल्या पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी माझ्याकडील आरडीएक्सने वैद्यनाथ मंदिर उडवीन, अशी धमकी कथित ड्रग माफियाने पत्राद्वारे दिली आहे. या प्रकरणी संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढववण्यात आली आहे.

शुक्रवारी वैद्यनाथ मंदिर सचिव राजेश देशमुख हे मंदिरात आले असता, टपालाद्वारे आलेली पत्रे ते पाहात होते. यातील एक पत्र व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) या नावाने आले होते. ते त्यांनी वाचून पाहिले अन् त्यांना धक्काच बसला. रतनसिंग रामसिंग दख्खने रा. काळेश्वर नगर, विष्णूपुरी, नांदेड) या पत्त्यावरुन हे पत्र आले. हे पत्र पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

बॉम्बशोधक व नाशक पथक परळीत दाखल

धमकीच्या प्रकार पोलिसांनी गांभीर्याने घेतला अस}d कसून तपास सुरू केला आहे . शनिवारी बीड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने मंदिर परिसराची तपासणी केली. श्वानपथकही बोलावण्यात आले होते.

दोन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पत्रात उल्लेख असलेल्या नावाबाबत पोलिसांनी नांदेड येथे जाऊन दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. एक व्यक्ती विमा प्रतिनिधी असून एकजण बांधकाम व्यावसायिक आहे. दहशतवाद विरोधी पथकाने त्यांची चौकशी केली असता आमच्यासोबत खोडसाळपणा केला गेला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुढील दोन दिवसांत आमची कोर्टाची तारीख असून, त्यांच्याशी वाद चालू आहे. त्याच व्यक्तींनी आमच्या नावाचा वापर करून पत्र लिहिले असल्याचा आरोपही ताब्यात घेतलेल्या दोघांनी केला आहे. ताब्यात घेतलेल्या लोकांकडून अधिकची माहिती घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

कोणीही घाबरून जाऊ नये; धमकी देणारे गजाआड होतील

वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे गजाआड दिसतील.कोणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी केले आहे. याबाबत फेसबुक पोस्ट करुन ना.धनंजय मुंडे यांनी धमकीच्या पत्राबाबत गांभीर्याने दखल घेतली आहे.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT