मराठवाडा

केज-कळंब रोडवर दोन मोटारींचा अपघात; कोणीही जखमी नाही

निलेश पोतदार

केज ; पुढारी वृत्‍तसेवा केज-कळंब रोडवर साळेगांव येथील शंकर विद्यालयाजवळ एका स्कॉर्पिओ आणि स्विफ्ट डिझायर या दोन गाड्यांचा अपघात झाला. मात्र सुदैवाने त्यात कोणीही जखमी झालेले नाही.

या बाबतची माहिती अशी की, आज (मंगळवार) सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास केज-कळंब रोडवर साळेगांव येथे शंकर विद्यालयाजवळ एका स्कॉर्पिओ गाडी क्र. (एम एच-१३/ डी टी-५१३३) ला एका स्विफ्ट डिझायर क्र. ( एम एच-०१/ बी टी-६७४१) गाडीने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

अपघाताची महिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशाने बिट जमादार बाबसाहेब बांगर, पोलीस नाईक शिवाजी कागदे व पोलीस नाईक हनुमंत गायकवाड हे घटनास्थळी हजर झाले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT