मराठवाडा

नांदेड : रायवाडीच्या प्रशस्त हिंदू समशानभूमीला ‘आयएसओ’ नामांकन

अनुराधा कोरवी

लोहा; पुढारी वृत्तसेवा : रायवाडी येथील स्मशानभूमी पाहून हालाखीचे जीवन जगण्यापेक्षा मरण आलेले बरे …! अशीच भावना नागरिकांच्या मनात येण्यासारखा विकास रायवाडी येथील हिंदू स्मशानभूमीचा करण्यात आला आहे. या स्मशानभूमीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते 'आयएसओ' नामांकन व ट्रॉफी देण्यात आले आहे. दरम्यान दोन महिन्यात मुस्लिम कब्रस्तानला देखील याच धरतीवर नामांकन मिळवून देऊ असे वर्षा ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

रायवाडी तालुका लोहा हे एक छोटेसे गाव. या गावाची लोकसंख्या जवळपास २००० आहे. गावाच्या सर्वांगीण विकास करायचा असेल तर सर्वांनी सहभाग घेणे गरजेचे आहे, याच भावनेतून येथील स्मशानभूमीचा पाहण्यासारखे आणि सर्व सुविधायुक्त विकास करण्यात आला आहे. याच स्मशानभूमीत गावातील बैठका मीटिंग व इतर सार्वजनिक कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे नेहमीच या स्मशानभूमीत लोकांची वर्दळ पाहावयास मिळते.

सोमवार (दिनांक २० मार्च) रोजी स्मशान भूमीला नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर घुगे व मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, गटविकास अधिकारी शैलेश व्हावळे, सेवानिवृत्त उपसचिव एकनाथ मोरे, सरपंच मनीषा विभुते, ग्रामसेवक जेडी मंगनाळे, रोजगार सेवक सय्यद मलंग, माजी सरपंच गोविंदराव विभुते यांच्यासह शाळेतील विद्यार्थी शिक्षक गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

रायवाडी येथील स्मशान भूमीत लोकांना बसण्यासाठी २७ बेंच, प्रथमोपचार पेटी, अस्थी स्टॅन्ड, पक्षांसाठी ८ पानवठे, महादेवाची मूर्ती, डोली, दोन रूम, दहा मोठे अभंगाचे बोर्ड, फुला व फळांचे २२२ झाडे, १०० बांबूच्या झाडाची लागवड करण्यात आली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुचनापेटी, लाईट व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर केली.

वर्षा ठाकूर यांच्या हस्ते स्मशानभूमीला 'आयएसओ' नामांकन व ट्रॉफी देण्यात आले आहे. यावेळी गावातील मुस्लिम कब्रस्तानलादेखील दोन महिन्यात नामांकन मिळेल आणि तेथील सर्व सुविधाचा विकास करण्यात येईल असे वर्षा ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT