विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. (Pudhari Photo)
परभणी

Vanchit Protest Parbhani | पूर्णा नगरपालिकेवर धडकला 'वंचित'चा जन आक्रोश मोर्चा

Jan Aakrosh Morcha Purna | प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन

अविनाश सुतार

Jan Aakrosh Morcha Vanchit Bahujan Aaghadi Purna

पूर्णा: पूर्णा नगरपालिकेवर विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (दि. ४) दुपारी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर झालेल्या सभेत दिलीप हनमंते, राजू नारायणकर , तुषार गायकवाड, सुनिल मगरे, रवी वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी करवाढ तत्काळ रद्द करावी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास जागा द्यावी, संत बसवेश्वर महाराजांचा पुतळा नियोजित जागेवर बसवावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सुशोभीकरण करावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते भिमनगर चुंगीनाका असा रस्ता करावा, पूर्णा शहरात फिल्टर पाणीपुरवठा करावा, कानखेड येथील डम्पिंग हटविण्यात यावी, भिमनगर येथील भैय्यासाहेब सांस्कृतिक सभागृहाचे काम पूर्ण करावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाची दुरुस्ती करण्यात यावी, शहरात नगरपरिषदेकडून आरोग्यकेंद्र उभारावेत, अंगणवाडी शाळा उभाराव्यात, प्लेग्राऊंड, उद्यान उभारावे, नालंदा नगरची कमान उभारावी, अशा मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

मोर्चात गणेश गाडे, सुनिता साळवे, तुकाराम ढगे, श्यामराव जोगदंड, तुकाराम भारती, शिदोधन सावंत, दिलीप मोरे, श्यामसुंदर काळे, आवडाजी ढवळे, आकाश गायकवाड, लक्ष्मीकांत शिंदे, अर्चना पंडित, नागेश एंगडे, लक्ष्मण गायकवाड, भोजाजी बनसोडे आदी सहभागी झाले होते.

करवाढ निर्णय हा शासनाचा- मस्के

दरम्यान, पालिकेने नव्याने केलेली मालमत्ता करवाढ रद्द करावी, यासाठी सीईओकडे शहरवासीयांकडून वारंवार निवेदने देण्यात येत आहेत. तसेच करवाढीविरोधात निघणारे मोर्चे ? या विषयी प्रस्तूत प्रतिनिधीने मालमत्ता कर निरीक्षक मस्के यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, मालमत्ता करवाढ करण्याचा निर्णय हा शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने घेतला आहे. वरिष्ठांकडून तसे आदेश आल्यामुळे करवाढ आकारली जात आहे. आम्हाला आदेशाचे पालन करावे लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT