पूर्णा येथील रेल्वे पुलावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. Pudhari Photo
परभणी

Parbhani News | पूर्णा येथे रेल्वे पुलावर आढळला छिन्नविछिन्न अवस्थेतील अनोळखी मृतदेह

लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा येथील रेल्वे पुलावर ४७ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रविवारी (दि.२७) सकाळी आढळून आला. मृतदेहाची छिन्नविछिन्न अवस्था झाली होती. या व्यक्तीचा रेल्वेची धडक लागून मृत्यू झाल्याचा अंदाज लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Parbhani News)

याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा शहरातील रेल्वे ब्रीजवर खंबा क्रमांक (३१७/२५/२७) नजीक एका ४७ वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह पटरीच्या मध्ये आढळून आला. घटनास्थळी लोहमार्ग पोलिसांनी मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. पण ओळख पटली नाही. या घटनेची नोंद लोहमार्ग पोलिस ठाण्यात झाली आहे. मृत व्यक्तीच्या अंगावर जीन्स पँट, काळा पांढरा शर्ट आहे. ५ फूट २ इंच उंची, बांधा सडपातळ असे त्याचे वर्णन आहे. मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालय‌ परभणी येथील शीतगृहात ठेवण्यात आला आहे. पुढील तपास रेल्वे लोहमार्ग पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT