मानवत येथे विद्यार्थिनींना अश्लील बोलल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   File Photo
परभणी

मानवत येथे विद्यार्थिनींना अश्लील बोलणे भोवले: शिक्षकावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा
डॉ. सचिन चिद्रवार

मानवत : मानवत येथील एका प्राथमिक शिक्षकांविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इयत्ता आठवीच्या अल्पवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींसमोर अश्लील भाषेत शब्द उच्चारून व विनाकारण छडीने मारहाण केल्याची तक्रार निर्भया पथकाने बसविलेल्या तक्रार पेटीत करण्यात आली. त्यानंतर शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दत्ता गंगाधर होगे (वय ४५) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. मागील १ वर्षांपासून शहरातील मोंढा परिसरातील शाळेत तो शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

सोमवारी (दि.३०) सकाळी ११:३० वाजता शाळेत पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकातील पोलीस अंमलदार शकुंतला चांदीवाले व सय्यद फय्याज यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी सवांद साधला. यावेळी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील होगे सराविरुद्ध तक्रार असल्याचे सांगत शाळेतील तक्रार पेटीत तक्रार टाकल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रार पेटी उघडली असता त्यात शिक्षकाविरोधात अनेक तक्रारी सापडल्या.

या घटनेची चौकशी केल्यानंतर शिक्षण विभागातील वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका छाया उमाजी गायकवाड (वय ५२, रा. लोकमान्यनगर, परभणी) यांच्या तक्रारीवरून शिक्षक दत्ता होगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पीएसआय दिगंबर पाटील करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT