मानवत; पुढारी वृत्तसेवा : मागील तीन दिवसात अतिवृष्टीमुळे संपूर्ण मानवत तालुक्यात नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी मानवत तालुका भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष विकास मगर यांनी केली आहे.
संबंधित बातम्या
भाजपकडून बुधवारी ( ता. २९ ) रोजी येथील तहसीलदार रजितसिंह कोळेकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले की, अतिवृष्टीमुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी, गहू, कापूस, भाजीपाला, फळबागा, हरभरा आदी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर भाजपचे तालुकाध्यक्ष विकास मगर, सुभाष जाधव, प्रकाश मगर, अशोक मगर, सुभाष निर्वळ, मुंजाभाऊ निर्वळ, माणिक मोगरे, गणेश गोरे, सुरेश थोरवट, दिलीप मगर, मारोती पितळे, गंगाधर पितळे, वामन गोलाईत, बाबासाहेब खरात यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.