Parbhani News : जिल्हा शल्यचिकित्सक अन् जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे निलंबन file photo
परभणी

Parbhani News : जिल्हा शल्यचिकित्सक अन् जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे निलंबन

आरोग्य उपसचिव केंद्रे यांनी काढले आदेश, विभागात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Suspension of District Civil Surgeon and District Health Officer

परभणी, पुढारी वृत्तसेवा: परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लक्कमवार आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पांचाळ यांचे आरोग्य उपसचिव दीपक केंद्रे यांनी तडकाफडकी निलंबन केले आहे या निलंबनामुळे आरोग्य विभागामध्ये एकच खळबळ उडाली असून उलट सूलट चर्चेला उधाण आले आहे.

परभणीच्या जिंतूर येथील शेख अमीना शेख आयुब या सात महिन्याच्या गर्भवती महिलेला परभणी स्त्री जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र महिलेची प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र दोन तास ताटकळ थांबूनही 108 रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेच्या आणि पोटातील बाळाचा मृत्यू झाला होता.

ही घटना अत्यंत गंभीर असून परभणीचे जिल्हा शैलेचिकित्सक डॉक्टर नागेश लखन मोरे यांनी त्यांच्याकडे असलेली नियंत्रकीय व प्रवेशकीय जबाबदारी योग्यरीत्या पार पडली नाही म्हणून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे यासोबतच त्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार असून निलंबन काळात त्यांचे मुख्यालय लातूर येथील मंडळ अधिकारी कार्यालय राहणार आहे. निलंबन काळात त्यांना कुठलेही खाजगी नोकरी अथवा काम करता येणार नाही.

यासोबतच परभणीच्या जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पांचाळ हे कामात अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निशा माथूर यांनी आरोग्य विभागाकडे सादर केला होता. या अहवालाची गंभीर दखल घेत डॉक्टर संजय पांचाळ यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांची देखील विभागीय चौकशी केली जाणारा असून चौकशी दरम्यान त्यांचे मुख्यालय धाराशिव हे राहणार आहे.

हे निलंबन पुढील आदेशापर्यंत कायम राहणार असल्याचे उपसचिव दीपक केंद्रे यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या कारभार पाहणाऱ्या दोन अधिकाऱ्यांचे थेट उपसंचालकांनी एकाच दिवशी निलंबन केले असल्याने आरोग्य विभागामध्ये एकच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT