सोनपेठ : टँकरच्या धडकेत वृद्ध पादचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळी जमलेली बघ्यांची गर्दी.  pudhari photo
परभणी

Parbhani Accident : सोनपेठमध्ये टँकरच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

नपेठ ते शेळगाव मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांमधून संताप

पुढारी वृत्तसेवा

सोनपेठ : सोनपेठ ते परभणी मार्गावरील अपघातांचे सत्र थांबता थांबेना झाले आहे. शनिवारी (दि. 14) सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील बसस्थानक परिसरातील वळणावर एका टँकरने पायी चालणाऱ्या 68 वर्षीय वृद्धाला चिरडले. या भीषण अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मागच्या टायरखाली चिरडले

सदाशिव दत्तात्रय हालगे (वय 68, रा. शेळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शेळगाव बसस्थानक परिसरातील वळणावरून टँकर (क्रमांक 23 3106) सोनपेठच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. टँकरच्या मागच्या टायरखाली आल्यामुळे सदाशिव हालगे यांचा जागीच अंत झाला.

अपघाताची माहिती मिळताच या मार्गावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अजय किरकन आणि पोलीस अंमलदार कुंडलिक वंजारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

चालक पोलिसांच्या ताब्यात

सोनपेठ पोलिसांनी संबंधित टँकर जप्त केला असून चालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सोनपेठ ते शेळगाव मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT