Parbhani News : परभणीत खा. संजय जाधवांवर संजय राऊतांचा घणाघात Pudhari Photo
परभणी

Parbhani News : परभणीत खा. संजय जाधवांवर संजय राऊतांचा घणाघात

बंडखोरांविरोधात 'ऑपरेशन तुडवा'ची केली घोषणा

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut criticizes MP Sanjay Jadhav in Parbhani

परभणी, पुढारी वृत्तसेवा : "शिवसेनेमध्ये अनेक आडू, पांडू, बंडू आले आणि गेले, तरीही शिवसेना मजबुतीने उभी राहिली आहे. यापुढे त्यांना 'बंडू द बॉस' म्हणू नका, तर '... बॉस' म्हणा," अशी जहरी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदार संजय जाधव यांच्यावर केली.

रविवारी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना खा. राऊत यांनी खा. जाधव यांच्यावर सडकून टीका केली. "ज्या माणसाने पिठाची गिरणी आणली नाही, तो माणूस परभणीची दुबई, सिंगापूर, स्वित्झर्लंड करणार आहे काय?" असा टोकदार सवाल त्यांनी उपस्थित केला.

परभणीमध्ये अनेकांनी गद्दारी केली, मात्र त्या गद्दारांना गाडण्याचे काम परभणीकरांनी यापूर्वीही केले आहे. आता बंडखोर खासदारांच्या विरोधात शिवसेनेने 'ऑपरेशन तुडवा' जाहीर केले असून, यासाठी कुठल्याही आदेशाची गरज नाही. हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश असल्याचे राऊत म्हणाले.

सध्या राज्यात भाजपचे 'ऑपरेशन टायगर' नाही, तर 'ऑपरेशन प्रभू रामचंद्र' सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला. भाजपने अयोध्येतील राम मंदिराच्या तिजोरीतील साडेपाचशे कोटी रुपयांवर डल्ला मारल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केला. खा. संजय राऊत यांच्या या घणाघाती भाषणाला उपस्थित शिवसैनिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही खा. राऊत यांच्या भाषणाला दाद दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT