Participate vigorously in the reservation battle Manoj Jarange
परभणी, पुढारी वृत्तसेवा: सत्ताधाऱ्यांनी मराठ्यांना हरविण्याचा चंग बांधल्याचा आरोप करत आरक्षणाच्या आरपारच्या लढाईत मोठ्या ताकदीने सहभागी व्हा, असे आवाहन संघर्षयोद्धा, मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी केले.
शहरातील सावली विश्रामगृहावर आयोजीत बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना जरांगे पाटील बोलत होते. मागील ४५ वर्ष अर्ज विनंत्या केल्यानंतर ही आरक्षण मिळाले नाही. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण कसे मिळवुन द्यायचे, ते मी बघतो. परंतु या आरपारच्या लढाईत तुमची साथ मोलाची आहे. जात हरली तर तुम्हाला आम्हाला किंमत उरणार नाही असेही जरांगे पाटील म्हणाले. २७ ऑगस्टला मोठ्या ताकदीने मुंबईच्या दिशेने रवाना व्हायचे असुन एक घर एक गाडी अशी मुंबईला जायची जोरदार तयारी करा. असे आवाहन ही जरांगे पाटील यांनी केले.
माझ्याकडे संपत्ती नाही, धन दौलत नाही परंतु माझा देह मी समाजासाठी ठेवु शकतो असेही जरांगे पाटील म्हणाले. २९ ऑगस्टच्या मुंबई येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने समाज माध्यमावर चलो मुंबई अशी पोस्ट टाकावी. आपल्या मित्र यादीतील प्रत्येकाला मुंबईला येण्या संदर्भात फोन करावा असेही जरांगे पाटील म्हणाले. मराठा आरक्षणाच्या या आरप ारच्या लढाईत मराठ्यांनी खुट्टा ठोकुन बसायला शिका. मराठे एकत्र येत नाहीत हा सत्ताधाऱ्यांचा समज समाजाने एकजुट दाखवत खोटा ठरवल्याचेही जरांगे पाटील म्हणाले. मराठा आर क्षणाची लढाई आरपारची लढाई असुन कुठल्याही परिस्थितीत मुंबईत घुसायचे म्हणजे घुसायचे असा निर्धार जरांगे पाटील यांनी बोलुन दाखवला. २९ ऑगस्ट पर्यंत रात्रीचा दिवस करुन गावा गावात चावडी बैठकांचे आयोजन करुन प्रत्येकाला मुंबईला येण्याचे आवाहन करा असे ही जरांगे पाटील म्हणाले.
गरजवंत मराठ्यांसाठी आरक्षण महत्वाचे असुन मराठ्यांची पोरं लाल दिव्याच्या गाडीत फिरावीत हे आपले स्वप्न आहे. सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बोलतांना सण वार येतच राहतील परंतु आरक्षण महत्वाचे आहे. मुंबईसाठी निघणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या शिस्तीचे दर्शन घडवत शांतता पाळण्याचे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर शेत मालाच्या भावाचा प्रश्न मार्गी लावणार आहे. वर्षभरामध्ये शेती प्रश्नावर लढा उभारून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.