Bharat Ghandat  Pudhari
परभणी

Parbhani ZP President | परभणी जि.प. अध्यक्षपदासाठी भरत घनदाट यांच्या नावाची चर्चा

पूर्णेतील चुडावा गटाला अध्यक्षपद लाभण्याची दाट शक्यता?

पुढारी वृत्तसेवा

Bharat Ghandat BJP

पूर्णा : परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवड बुधवारी (दि. १८) होणार असून, महायुतीची सत्ता स्थापन करण्यासाठी वरिष्ठ सत्ताधारी पातळीवरून हालचाली वेगाने सुरू आहेत. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या घटक पक्षांचे सदस्य एकत्र येत बहुमताच्या जोरावर पदांची निवड करतील, अशी माहिती समोर येत आहे.

परभणी जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या पार्श्वभूमीवर पूर्णा तालुक्यातील चुडावा गटातून भाजपा तिकिटावर मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले भरत घनदाट यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीपूर्वीपासूनच त्यांना अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार मानले जात होते, त्यामुळेच मतदारांनी त्यांना मोठा पाठिंबा दिला.

जिल्हा परिषदेत एकूण ५४ जागांपैकी भाजपाचे २४ सदस्य निवडून आल्याने महायुतीत भाजपाचे संख्याबळ सर्वाधिक आहे. त्यामुळे अध्यक्षपद भाजपाकडे, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, तर सभापतीपदे शिवसेनेकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, माजी आमदार सिताराम मामा घनदाट यांचे नातू भरत घनदाट यांना अध्यक्षपद मिळावे यासाठी राजकीय पातळीवर हालचाली सुरू असून, काही प्रमुख नेत्यांकडून त्यांच्यासाठी जोरदार लॉबिंग होत असल्याची चर्चा आहे.

भरत घनदाट यांची अध्यक्षपदी निवड झाल्यास पूर्णा तालुक्यातील चुडावा गटाला प्रथमच जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली असून, त्यांच्या निवडीसाठी प्रार्थना केली जात असल्याचे चित्र दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT