अपघातात नागेश पिसाळ याचा जागीच मृत्यू झाला.  Pudhari Photo
परभणी

परभणी: अज्ञात वाहनाच्या धडकेत एरंडेश्वरचा तरूण ठार; एकजण गंभीर जखमी

Parbhani Accident News | पूर्णा- झिरोफाटा रोडवरील कात्नेश्वर शिवारातील घटना

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा ते झिरोफाटा रोडवरील कात्नेश्वर शिवारात एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. नागेश नामदेव पिसाळ (वय २४, रा. एरंडेश्वर, ता. पूर्णा) असे मृत तरुणाचे नाव आहे. नवनाथ माणिकराव होळपादे (वय २५, रा. एरंडेश्वर) असे जखमीचे नाव आहे. घटनेनंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झाला. ही घटना शुक्रवारी (दि.२८) रात्री ९ च्या सुमारास घडली. (Parbhani Accident News)

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास नागेश पिसाळ आणि नवनाथ होळपादे दुचाकीवरून पूर्णेकडून एरंडेश्वर गावाकडे जात होते. यावेळी कात्नेश्वर शिवारात बांधकाम सुरू असलेल्या शेडनजीक त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोराची धडक देऊन उडवले. या अपघातात दुचाकीवरील नागेश याच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर नवनाथ गंभीर जखमी झाला असून त्याला परभणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृत नागेश पिसाळ हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई- वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे एरंडेश्वर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेची नोंद पूर्णा पोलिसांत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT