परभणी : होरपळलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

वाई येथील घटना
परभणी : होरपळलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
File Photo
Published on
Updated on

चारठाणा : अंघोळीसाठी चुलीवर पाणी ठेवत असताना अंगावरील साडीने अचानक पेट घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अखेर उपचारा दरम्यान बुधवारी (दि.२६) मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुरूवारी (दि.२७) रात्री उशीरा अकास्मित मुत्युची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत आधिक माहिती अशी की, सेलू तालुक्यातील वाई येथील सरस्वती नाथराव अघाव (वय ४०) ही महिला २५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी सहाच्या सुमारास चुलीवर अंघोळीसाठी पाणी ठेवत असताना तिच्या अंगावरील साडीने पेट घेतल्याने यामध्ये सदर महिलेचे दोन्ही पाय गंभीर जळाले. दरम्यान, परभणी येथे उपचार सुरू असताना दि.२६ फेब्रुवारी रोजी ती मरण पावली. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात अकास्मित मुत्युची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक पूंड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउनि दत्ता भदर्गे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news