कृषी उत्पन्न बाजार समिती www.pudhari.news  File Photo
परभणी

Parbhani|ताडकळस येथे कच्च्या पावत्या देऊन शेतकऱ्यांची लूट, कृषी बाजार समिती अंतर्गत व्यापाऱ्यांना सक्त सूचना देण्याची मागणी

Parbhani | ताडकळस येथे कच्च्या पावत्या देऊन शेतकऱ्यांची लूट, कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत व्यापाऱ्यांना सक्त सूचना देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मनमानीपणे माल खरेदी करुन बाजार पेठेत आलेल्या शेतकऱ्यांची कमी भावात माल खरेदी करून लुट केली जाते

शेतकऱ्यांना अधीकृत पावत्या दिल्या जात नसून कच्च्या पावत्या दिल्या जात आहेत शेतकऱ्यांची होणारी लुट थांबवण्याची शेतकऱ्यांतून मागणी

ताडकळस - ताडकळस व परिसरातील शेतकरी ताडकळस येथील बाजार पेठेत सोयाबीन व इतर माल विक्रीसाठी बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. परंतु, काही व्यापारी इतर बाजार पेठेत जे भाव आहेत. त्यापेक्षा कमी भाव दाखवून एक प्रकारे लुट केली. शेतकरी वर्गाची अडचण लक्षात घेऊन याच संधीचा पुरेपूर फायदा घेऊन कमी भावाने शेतकऱ्यांचा माल खरेदी करून लुट केली जाते. विशेष बाब म्हणजे एकाही शेतकऱ्याला अधीकृत कृषी उत्पन्न बाजार समितीची पक्की पावती दिली जात नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच अनेक व्यापाऱ्यांनी कच्च्या पावत्या शेतकऱ्यांना देऊन गेल्या काही वर्षांत दिवाळखोरी करून अनेक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आणि पैसे न देता ते पसार झाले.

याचे मुख्य कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांकडे व्यापाऱ्यांना विकलेल्या मालाची अधीकृत पक्की पावती नसल्याचे कारण आहे. या सर्व प्रकाराकडे ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ लक्ष देईल का? असा प्रश्न विचारला जात आहे. अजुन किती दिवस शेतकऱ्यांनी हा चाललेला प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत राहून सहन करायचा, याला आळा बसणे गरजेचे असून शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लुट थांबणे गरजेचेच आहे.

ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील या सर्व प्रकाराकडे ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांची होणारी लुट त्वरीत थांबवावी आणि ओपन लिलाव पद्धतीने शेतकऱ्यांचा बाजार समितीमध्ये आलेला माल खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांना सक्त सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी ताडकळस व परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT