Illegal Liquor Seized Parbhani Pudhari
परभणी

Parbhani Crime | सोनपेठ तालुक्यात अवैध दारूसाठ्यावर धडक कारवाई; ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त

सोनपेठ तालुक्यातील खडका येथे स्थानिक गुन्हे शाखेने अवैध देशी दारूसाठ्यावर धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Illegal Liquor Seized Parbhani

सोनपेठ : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील खडका येथे स्थानिक गुन्हे शाखेने अवैध देशी दारूसाठ्यावर धडक कारवाई करत ५४ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांविरोधात माहिती संकलित करून कारवाईसाठी गस्त घालत असताना, गुप्त बातमीदारामार्फत खडका येथील एका व्यक्तीने आपल्या घरात मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधिताच्या घरावर छापा टाकला.

छाप्यादरम्यान विलास बाळासाहेब जाधव (रा. खडका, ता. सोनपेठ) हे घराच्या अंगणात झोपलेल्या अवस्थेत आढळले. चौकशीदरम्यान घरात ठेवलेला ‘भिंगरी संत्रा’ या ब्रँडच्या देशी दारूचे एकूण १४ बॉक्स पोलिसांनी जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ५४ हजार ८० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस जमादार राजेश मस्के करीत आहेत.ही कारवाई परभणीचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे व पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस जमादार माणिक वाघ, राहुल परसोडे, महेश कवठाळे तसेच पोलीस अंमलदार दिलीप निलपत्रेवार, शरद सावंत आणि महारुद्र सपकाळ यांनी सहभाग घेतला. याशिवाय सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुंढे, पोलीस अंमलदार देवकते आणि चालक शिंदे यांनीही कारवाईस मोलाचे सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT