एक गावठी कट्टा, सहा जिवंत काडतुसे आणि दोन मोबाईल फोन असा सुमारे ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला Pudhari
परभणी

Parbhani Crime | सोनपेठमध्ये ग्रामपंचायत वादातून हल्ल्याचा कट उधळला; गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद

सोनपेठ तालुक्यातील धामोनी येथे ग्रामपंचायत वादातून दोन गटांमध्ये तणाव

पुढारी वृत्तसेवा

Sonpeth Gram Panchayat Dispute

सोनपेठ : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून निर्माण झालेल्या जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी शस्त्रसज्ज होऊन हल्ल्याची तयारी करणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा, सहा जिवंत काडतुसे आणि दोन मोबाईल फोन असा सुमारे ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गंगाखेड विभागात पेट्रोलिंग करत असताना सोनपेठ तालुक्यातील धामोनी येथे ग्रामपंचायत वादातून दोन गटांमध्ये तणाव असल्याची माहिती मिळाली. यापूर्वी झालेल्या मारहाणीच्या (हाफ मर्डर) गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी काही जण शस्त्रसज्ज होऊन हल्ल्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.

या माहितीनुसार विठ्ठल गुंजाळ आणि त्याचा नातेवाईक आशिष सावंत यांनी उत्तर प्रदेशातून गावठी कट्टा व सहा जिवंत काडतुसे आणल्याचे उघड झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई एपीआय जायभाये, पीएसआय परिहार, महेश कवठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, सचिन भदर्गे, शरद सावंत, दिलीप निलपत्रेवार आणि चालक महारुद्र सपकाळ यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT