Parbhani Crime | मानवतमध्ये हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ, डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी

संबधितावर कारवाई करण्याची डॉक्टर्स संघटनेची मागणी
संबधितावर कारवाई करण्याची मागणी डॉक्टर्स संघटनेने तहसिलदार यांना निवेदनाद्वारे केली.
संबधितावर कारवाई करण्याची मागणी डॉक्टर्स संघटनेने तहसिलदार यांना निवेदनाद्वारे केली.
Published on
Updated on

मानवत : शहरातील बारहाते डायग्नोस्टिक सेंटर मधील कार्यरत कर्मचाऱ्यास शिवीगाळ व डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी दिलेल्या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात शहरातील एक जनाविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी मंगळवारी ता 16 डॉक्टर्स संघटनेच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली.

याप्रकरणी गोपाळ मुरलीधर पिंपळे वय 26 वर्ष, यांनी तक्रार दिली असून यामध्ये भिमसींग ठाकुर याने येऊन मला एक्सरे काढायचे आहे असे सांगीतले. प्रिस्क्रीप्शन दया व पैसे भर सांगितल्यावर मला पैसे का मागितले? तुझा दवाखाना फोडुन, जाळुन टाकीन असे म्हणुन मारहाण केली. तसेच तुला व तुझ्या डॉक्टरला खतम करुन टाकतो अशी जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

डॉक्टर्स असोसिएशनचे निवेदन

याप्रकरणी मानवत तालुका डॉक्टर असोसिएशन ने तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी संघटनेचे डॉ. सचिन कदम, डॉ.संतोष खडसे, डॉ. स्वप्नील वट्टमवार, डॉ. राजकुमार लड्डा, डॉ. सुशील नाकोड, डॉ. श्याम वाघमारे, डॉ. लहुकुमार सोळंके, डॉ. भारत कदम, डॉ. संतोष जाधव, डॉ. नामदेव हेंडगे, डॉ राजीव जाधव उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news