Parbhani Sonpeth sugarcane issue
सोनपेठ : उसाला प्रती टन तीन हजार रुपये पहिली उचल मिळावी, यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी खडका व सायखेडा पाटीवर टायर जाळून ऊस तोड व वाहतूक बंद करण्याचा इशारा दिला आहे.
बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाच्या पहिल्या उचलीसाठी सुरु केलेल्या आंदोलनाचे लोन आता सोनपेठ तालुक्यात पसरु लागले आहे. सोनपेठ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एक बैठक घेऊन उसाला पहिली उचल तीन हजार रुपये मिळावी, या साठी खडका येथील व्टेन्टीवन शुगर या करखान्यावर सोमवारी (दि. १ डिसेंबर) तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
त्यासाठी तालुक्यातील ऊस उत्पादक गावोगावी बैठका घेत असून उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २९) सायखेडा कारखान्याच्या दोन्ही बाजुला खडका व सायखेडा पाटीवर टायर जाळून तालुक्यातील ऊसतोड व वाहतूक बंद करण्याचा इशारा ऊस उत्पादक आंदोलकांनी दिला आहे.
या आंदोलनास परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. गंगाखेड येथील प्रचार सभेत ऊस दराची मागणी सायखेडा येथील २१ शुगरचे सर्वेसर्वा आमदार अमित देशमुख यांच्या प्रचार सभेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस दरा बाबत विचारणा केली. यावेळी पोलिसांनी विचारणा करणाऱ्या रामेश्वर मोकाशे, सुरेश ईखे व ओंकार पवार यांना ताब्यात घेतले होते.