Parbhani Shiv Sena UBT pudhari photo
परभणी

Parbhani Shiv Sena UBT: परभणीत ठाकरे सेनेचा बंडखोरांना 'चेकमेट', नव्या शिलेदारांची नियुक्ती

राजीनामा नाट्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांच्या केल्या नियुक्त्या

पुढारी वृत्तसेवा

परभणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात बदलाचे वारे वाहत असून काही दिवसांपूर्वी राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या जागी नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत शिवसेना पक्ष नेतृत्वाने राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांना चेकमेट दिल्याचे बोलले जात आहे.

खा. संजय जाधव यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर खा. संजय जाधव यांच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांच्या समर्थनार्थ काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. पक्ष नेतृत्वाने हे राजीनामे स्विकारत केवळ दोन आठवड्याच्या आत नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे.

मागील 2 महिन्यापासून खा. संजय जाधव यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेने जोर धरल्यानंतर खासदार समर्थक कार्यकर्ते व शिवसैनिकांमध्ये समाजमाध्यमावर वाद-प्रतिवाद रंगल्याचे पहावयास मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी खासदार समर्थक कार्यकर्त्यांनी राजीनामे देत खा. संजय जाधव ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असल्याचे स्पष्ट केले होते. सोमवारी (दि.11) शिवसेनेने नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून संघटनात्मक बांधणीकडे लक्ष दिल्याचे दिसून येत आहे.

पाथरी विधानसभा मतदार संघ प्रमुख म्हणून कल्याणराव रेंगे-पाटील यांच्याकडे, सेलू विधानसभाप्रमुख म्हणून राम खराबे-पाटील यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. उपजिल्हाप्रमुख म्हणून कृष्णा पिंगळे, मुंजाभाऊ कोल्हे, भारत पवार, माधव शेंडगे, साहेबराव कल्याणकर, बालाजी लोखंडे यांना संधी दिली आहे.

सोनपेठ तालुकाप्रमुख म्हणून संतोष गवळी, मानवत तालुकाप्रमुख म्हणून प्रभाकर कदम, पाथरी तालुकाप्रमुख म्हणून हरिभाऊ वाकणकर, सेलू अरुण ताठे, जिंतूर (बोरी विभाग) ऋतीक पांडे, जिंतूर तालुकाप्रमुख म्हणून किरण देशमुख, गंगाखेड, जानकीराम पवार, पालम बापुराराव पौळ, पूर्णा छगणराव मोरे यांची तालुकाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. परभणी तालुका संघटकपदी आत्माराम वाघ, गंगाखेड धोंडीराम जाधव, पालम एकनाथ मेोहिते यांची निवड करण्यात आली आहे.

मानवत शहरप्रमुखपदी बालाजी दहे, राणीसावरगाव माधव जाधव, पालम शेख मुकरम, पूर्णा प्रताप कदम, जिंतूर अरविंद कटारे यांची शहरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सेलू शहर संघटकपदी शक्ती बोराडे, गंगाखेड शहर संघटकपदी अमोल खटींग, जिंतूर कांतराव धानोरकर या विषयी निवड करण्यात आली आहे. गंगाखेड युवासेना तालुकाधिकारी म्हणून भागवत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. आ.डॉ. राहुल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, विष्णू मुरकुटे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले आहे.

निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय

शिवसेनेत काही दिवसांपूर्वी घडलेल्या राजीनामा नाट्यानंतर शिवसेना पक्ष नेतृत्वाने अवघ्या दोन आठवड्याच्या आत नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना संधी मिळाल्याचे दिसून येत आहे. काही पदाधिकाऱ्यांना शहरप्रमुख पदावरून उपजिल्हाप्रमुख पदावर बढती दिली असल्याचे दिसून येत आहे. स्वीकृतसाठी तयार होणार हे 11 मे पूर्वीच ठरवावे लागणार असल्याने राजकीय पक्षातील नेतेमंडळींची चांगलीच डोकेदुखी वाढणार असल्याचे पहावयास मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT