Khed NCP | दापोलीत राष्ट्रवादी काँग्रेसला घरघर; खेड तालुकाध्यक्षांचा राजीनामा

दापोली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हान
Khed NCP Taluka President Resignation
खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदमPudhari
Published on
Updated on

Khed NCP Taluka President Resignation

खेड: दापोली विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षामध्ये अस्थिरतेची चिन्हे दिसू लागली आहेत. खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

कदम यांनी आपला राजीनामा जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याकडे सादर केला असून, वैयक्तिक कारणांमुळे पक्षाच्या कामकाजाला पुरेसा वेळ देता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी आपल्या पत्रात सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्याचा उल्लेख करत, जबाबदारी पार पाडण्यात येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला आहे.

Khed NCP Taluka President Resignation
Ratnagiri News : खेड तालुक्यात राजकीय भूकंप! जामगे येथे ठाकरे सेनच्या तालुका प्रमुखासह कार्यकर्त्यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

कदम यांच्या या अचानक निर्णयामुळे दापोली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हान उभे राहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात पक्षाची बांधणी मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न लक्षात घेता, त्यांच्या जाण्याने पक्षात पोकळी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मतदारसंघातील काही सरपंच आणि स्थानिक पदाधिकारी शिवसेना (शिंदे गट) कडे झुकत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Khed NCP Taluka President Resignation
Ratnagiri News : दापोलीत ‌‘हाय-प्रोफाईल‌’ गुंतवणुकीची चर्चा

याच पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव तसेच नुकतेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले अजय बिरवटकर यांच्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात नाराजी व्यक्त होत असल्याचे समजते. विशेष म्हणजे, बिरवटकर हे सुनील तटकरे यांचे नातेवाईक असल्याने त्यांच्या विरोधात उघडपणे बोलण्यास अनेक कार्यकर्ते टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे.

या सर्व घडामोडींमुळे दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटन टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आता पक्ष नेतृत्व नव्या अध्यक्षाची निवड करून परिस्थिती कशी हाताळते आणि नाराज कार्यकर्त्यांना कसे थांबवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news