शिंगणापूर येथील महिलांनी दारूबंदी करण्यासाठी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. Pudhari
परभणी

Liquor Ban | शिंगणापुरात दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार: २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करणार

Parbhani News | परभणी राज्य उत्पादक शुल्क कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार

पुढारी वृत्तसेवा

Parbhani Shinganapur liquor ban

परभणी : तालुक्यातील शिंगणापूर गावामध्ये अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. ग्रामपंचायतीने २४ ऑगस्ट रोजी दारूबंदीचा ठराव घेतल्यानंतरही गावात दारूची खुलेआम विक्री सुरू असून, या पार्श्वभूमीवर शिंगणापूर येथील महिला २ ऑक्टोबररोजी परभणी राज्य उत्पादक शुल्क कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

गावातील तरुण पिढी अवैध दारूच्या विळख्यात सापडत असल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या समस्येवर तोडगा निघावा यासाठी ग्रामपंचायत शिंगणापूरने सरपंचांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन दारूबंदीचा ठराव मंजूर केला होता. तरीदेखील उत्पादक शुल्क विभागाच्या आशीर्वादाने दारू विक्री सुरू असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

यापूर्वी २४ ऑगस्टरोजी शंभर ते दीडशे महिलांनी परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट देऊन निवेदन सादर केले होते. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे संतप्त महिलांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी सोनाली खिल्लारे, प्रियंका रत्नपारखे, वैष्णवी खिल्लारे, सुमित्रा खिल्लारे आदी महिला ग्रामस्थ उपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT