Purna municipal council election
पूर्णा : पूर्णा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत प्रभाग क्रमांक १-ब आणि प्रभाग क्रमांक १०-ब या दोन जागांसाठी शनिवारी (दि. २०) मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सहा मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. या दोन्ही प्रभागांत मिळून 70.92 टक्के मतदान झाले.
प्रभाग क्रमांक १-ब मध्ये एकूण ३,१२० मतदारांपैकी २,३१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या प्रभागात यशवंत सेनेचे शेख ईरफान शेख इलियास, काँग्रेसचे जाकीर कुरेशी आणि उबाठा पक्षाचे शेख जावेद यांच्यात तिरंगी लढत होती.
प्रभाग क्रमांक १०-ब मध्ये एकूण २,४३० मतदारांपैकी १,६२४ मतदारांनी मतदान केले. या प्रभागात यशवंत सेनेचे सुनील जाधव आणि काँग्रेसच्या उषा दवणे यांच्यात थेट लढत झाली.
यापूर्वी नगराध्यक्ष पदासह २३ जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते.
दरम्यान, पूर्णा नगरपरिषद निवडणुकीचा निकाल रविवारी (ता. २१ डिसेंबर) सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे. तहसील कार्यालयात ईव्हीएमद्वारे प्रभागनिहाय मतमोजणी होणार असून नगराध्यक्ष पदासह ११ प्रभागांतील २३ सदस्य निवडले जाणार आहेत. निकालाकडे कार्यकर्ते, उमेदवार आणि नागरिकांचे लक्ष लागले असून राजकीय वर्तुळात उत्सुकता कमालीची वाढली आहे.