Parbhani news : कमलापुरात वाळलेल्या सोयाबीनची शेतकऱ्याने वैतागून केली होळी file photo
परभणी

Parbhani news : कमलापुरात वाळलेल्या सोयाबीनची शेतकऱ्याने वैतागून केली होळी

तालूक्यातील कमलापूर येथील खरीप हंगामात कोरड्या दुष्काळात वाळून गेलेल्या तीन-चार एकरातील सोयाबीन पिकाची शेतकऱ्यांनी अखेर वैतागून बुधवारी (दि.२३) अक्षरशः होळी केली.

पुढारी वृत्तसेवा

Parbhani News: Frustrated farmer sets fire to dried soybean crop in Kamalapur

पूर्णा पुढारी वृत्तसेवा : तालूक्यातील कमलापूर येथील खरीप हंगामात कोरड्या दुष्काळात वाळून गेलेल्या तीन-चार एकरातील सोयाबीन पिकाची शेतकऱ्यांनी अखेर वैतागून बुधवारी (दि.२३) अक्षरशः होळी केली.

मागील पावणेदोन महिन्यांपासून पाऊसाने उघडीप दिली. परिणामी, कोरडा दुष्काळ पडल्यामुळे शेतात शेंग दाण्यावीना चिपट्या शेंगा लगडलेले अन् पावसाअभावी वाळून गेलेले गट क्र. ४७मधील तिन चार एकरातील उभे सोयाबीन कापून ढिग जमा करुन शेतकरी व्यंकटी गोविंद मोरे, केशवराव मोरे, चंदक्रलाबाई या शेतकऱ्यांनी हे वाळलेले सोयाबीन ठेवून तरी काय करावे? म्हणून संतापून अक्षरशः पेटवून जाळून टाकले.

सदरील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील होत आहे. त्यामुळे कोरड्या दुष्काळात पिचलेल्या एकना अनेक शेतकऱ्यांची व्यथा आता समोर येत आहे. तरी देखील सरकार कोरडा दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तातडीच्या उपाययोजना आणि आर्थिक मदत जाहीर करीत नाही. या उलट, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोरडा दुष्काळग्रस्त विदर्भ मराठवाडा भागात पाहणी दौरे करुन वेळ वाया घालवत आहेत.

कोरड्या दुष्काळात खरीपातील सर्व पिके सुकून वाळून गेली असता हे विदारक चित्र सर्वज्ञात अन् उघड झाले असताना पिक पाहणी करण्याची काही आवश्यकता नसताना मंत्री मंडळ पाहणी दौरे काढून वेळकाढूपणा तर करत नाहीना? असा सवाल शेतकरी वर्गातून केला जात आहे.

सध्या कोणतेही पाहणी दौरे न करता ही वेळ तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी मदत आनूदान आकडेवारी जाहीर करण्याची गरज आहे. सरकार असे न करता शेतकऱ्यांचा अजून किती दिवस अंत पाहणार आहे? त्यामुळे शेतकरी सरकारच्या धोरणावर असंतोष व्यक्त करत आहे. दुष्काळ आनूदान, पिक विमा भरपाई देत नाही. "केवळ बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी" केली जात आहे. प्रत्यक्षात निर्णय मात्र घेतला जात नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT