Parabhani news : सोयाबीनसाठी बीबीएफ तंत्रज्ञान फायदेशीर : पालकमंत्री file photo
परभणी

Parabhani news : सोयाबीनसाठी बीबीएफ तंत्रज्ञान फायदेशीर : पालकमंत्री

सोयाबीन उत्पादनात वाढ करण्यासाठी 'बीबीएफ' तंत्रज्ञान अत्यंत फायदेशीर ठरत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Parbhani News: BBF technology beneficial for soybean: Guardian Minister

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : हवामानातील अनिश्चिततेच्या काळात पिकांचे नुकसानटाळण्यासाठी आणि सोयाबीन उत्पादनात वाढ करण्यासाठी 'बीबीएफ' तंत्रज्ञान अत्यंत फायदेशीर ठरत आहे. या पद्धतीमुळे अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा योग्य निचरा होतो आणि कमी पाऊस पडल्यास जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकून राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

जिंतूर तालुक्यातील मौजे कसर येथे कृषी विभागाच्या वतीने बीबीएफ (रुंद आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रमुख उपस्थिती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि स्वतः शेतात जाऊन या आधुनिक पेरणी पद्धतीची पाहणी केली.

तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रात्यक्षिक कार्यक्रमाप्रसंगी कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित राहून त्यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. यावेळी प्रामुख्यानेः किशोर खिस्ते, अभिजीत पारवे, माधव दराडे, आत्माराम पवार, विठ्ठल शिंदे सरपंच कसर, नितीन घुगे (तालुका कृषी अधिकारी) सुनील कदम (मंडळ कृषी अधिकारी) स्वप्निल देशमुख (सहाय्यक कृषी अधिकारी) गजानन घुगे (सहाय्यक कृषी अधिकारी) यांच्यासह कृषी विभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान तालुका कृषी अधिकारी नितीन घुगे यांनी बीबीएफ यंत्राची कार्यपद्धती आणि बीजप्रक्रियेचे महत्त्व याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT