Matka Gambling Raids  (file photo)
परभणी

Parbhani Crime | मानवत शहरात मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; आरोपी अटकेत, रोख रक्कम जप्त

रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त

पुढारी वृत्तसेवा

Manwat Police Raid

मानवत : मानवत शहरातील शासकीय विश्रामगृहासमोरील सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या मटका जुगारावर पोलिसांनी धाड टाकत एका आरोपीला अटक केली. या कारवाईदरम्यान रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, संबंधित ठिकाणी एक व्यक्ती लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार चालवत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ छापा टाकला.

या धाडीत अशोक महादेव कदम (रा. भगतसिंग नगर, मानवत) हा आरोपी घटनास्थळीच आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ६६० रुपयांची रोख रक्कम, मटक्याचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या तसेच एक बॉलपेन जप्त करण्यात आले.

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलम १२(अ) अंतर्गत मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०१४८/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी शेख जावेद करीत आहेत.

दरम्यान, शहरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर सातत्याने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT