Crime News pudhari photo
परभणी

Parbhani Crime | मानवत येथे आरतीवेळी गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने चौघांवर चाकू, लोखंडी रॉडने हल्ला

पेठमोहल्ल्यातील घटना; तिघांविरुद्ध जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Manwat Knife Attack

मानवत : घरासमोर देवीच्या आरतीदरम्यान सुरू असलेल्या गाण्यांचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या रागातून चौघांवर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना मानवत शहरातील पेठमोहल्ला भागात घडली. या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून, याप्रकरणी शनिवारी (दि. १७) मानवत पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पेठमोहल्ला येथील रहिवासी प्रसाद विष्णू आळसपुरे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास देवीच्या आरतीदरम्यान मोठ्या आवाजात गाणी सुरू होती. या गाण्यांचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने संतप्त झालेल्या आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी प्रदीप अग्रवाल, रोहित उर्फ सदा अग्रवाल आणि विशाल उर्फ गजानन अग्रवाल यांनी हातातील चाकू आणि लोखंडी रॉडने प्रसाद आळसपुरे, त्यांचे वडील विष्णू आळसपुरे, भाऊ अभिषेक आळसपुरे तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेले राजू विभुते यांच्यावर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात चौघे जखमी झाले.

जखमींवर मानवत येथील ग्रामीण रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेत आरोपी प्रदीप अग्रवाल हेदेखील जखमी झाले आहेत.

या प्रकरणी मानवत पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT