Parbhani Farmer end of life 
परभणी

Parbhani Farmer end of life | मानवत तालुक्यात कोरड्या दुष्काळाचा बळी, कर्जबाजारी शेतकऱ्याने विष पिऊन संपवले जीवन

Parbhani Farmer end of life | मानवत तालुक्यात कोरड्या दुष्काळाचा बळी, कर्जबाजारी शेतकऱ्याने विष पिऊन संपवले जीवन

पुढारी वृत्तसेवा

मानवत : कोरडा पडलेला दुष्काळ आणि बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फिटेल, या विवेंचनेत असलेल्या एका शेतकऱ्याने विष पिऊन आपले जिवन संपवले. मानवत तालुक्यातील सारंगापूर येथील 55 वर्षीय शेतकऱ्याबद्दल रविवारी, 27 रोजी रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली.

बन्सी आश्रोबा चौखट शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती बँक मंगरूळ या बँकेचे कर्ज होते. सततची नापिकी व या वर्षीचा दुष्काळ मुळे कर्ज कसे फिटावे, या विचारात त्यांनी शेतात जात कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध पित असल्याचे मोबाईलवरून घरच्या मंडळींना सांगितले.

शेतातील चिंचाच्या झाडाखाली त्यांनी विषारी औषध घेऊन आयुष्य संपवले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी शेतात धाव घेत त्यांना पुढील उपचारासाठी परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

त्यांचा पुतण्या अनिल ज्ञानोबा चोखट (वय 30) याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा व चार मुली असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT