Meghana Bordikar vs Rajesh Vitekar Pudhari
परभणी

Manvat Politics | मानवतच्या विकास निधीवरून पालकमंत्री - आमदारांमध्ये सोशल मीडियावर रंगला श्रेयवाद

Parbhani News | राज्याच्या अर्थसंकल्पात मानवतसाठी 27 कोटी 36 लाखांचा निधी

पुढारी वृत्तसेवा

Meghana Bordikar vs Rajesh Vitekar

डॉ. सचिन चिद्रवार

मानवत : नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मानवत तालुक्यातील विकासकामांसाठी 27 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर कामांचे श्रेय घेण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये सोशल मीडियावर चढाओढ सुरू झाल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या नेत्या व जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांच्यात या संदर्भात श्रेयवाद रंगताना दिसत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर करत राज्यातील विविध विकासकामांसाठी निधी जाहीर केला. त्यामध्ये मानवत तालुक्यातील नागरजवळा व्हाया किन्होळा ते रामेटाकळी या 14 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मानवत शहरात शासकीय विश्रामगृह बांधकामासाठी 2 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्य शासनाकडून निधी मंजूर होताच पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर या कामांची माहिती देत राज्य शासनाचे आभार मानले. मात्र या विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चढाओढ सुरू झाल्याचे दिसून येत असून याबाबत नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

अनेक रस्ते कामे प्रलंबित

मानवत तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे काही गावांतील नागरिक जवळच्या इतर तालुक्यांतील बाजारपेठेकडे वळत असल्याने मानवतची बाजारपेठही दिवसेंदिवस ओस पडत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT