Employees Strike Pudhari
परभणी

Land Records Strike | तांत्रिक वेतनश्रेणीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीच्या वतीने १८ फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू

पुढारी वृत्तसेवा

Land Records Employees Strike

मानवत: राज्यातील भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक वेतनश्रेणी लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्य भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीच्या वतीने १८ फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. ३ मार्चपासून संपूर्ण बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्य शासनाला देण्यात आला आहे.

४ जून रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. त्यावेळी १५० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, निर्धारित कालावधी संपूनही मागण्यांवर निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

प्रमुख मागण्या

  • तांत्रिक वेतनश्रेणी लागू करणे.

  • भूकरमापक व परिरक्षण भूकरमापक यांच्या वाढीव पदांसह सुधारित आकृतीबंध मंजूर करणे.

  • मोजणी कर्मचाऱ्यांना निश्चित प्रवासभत्ता देऊन तो वेतनात समाविष्ट करणे.

  • तांत्रिक ज्ञान नसलेल्या इतर विभागातील अधिकाऱ्यांची बदली/प्रतिनियुक्ती थांबवणे.

  • विभागाच्या खाजगीकरणाचा निर्णय रद्द करणे.

  • शेत रस्ते मोजणी व हद्दकायम संदर्भातील २९/०८/२०२५ च्या शासन निर्णयात सुधारणा करणे.

  • मोजणी या बाबीचा धोरणात्मक विषय म्हणून समावेश करू नये.

  • भूमी अभिलेख विभाग तांत्रिक असल्याने जमाबंदी आयुक्त व संचालक पदे भारतीय अभियांत्रिकी सेवेतून (IES) भरणे.

  • उपसंचालक कमलाकर सुधाकर हट्टेकर यांची विभागाबाहेर बदली करणे.

जमाबंदी आयुक्त स्तरावरील प्रलंबित मागण्या

ई-मोजणी व्हर्जन २ सॉफ्टवेअर अधिक सुटसुटीत व वापरास सोपे करणे.

अधिकारी/कर्मचाऱ्यांवर नियुक्ती प्राधिकाऱ्यांची परवानगी व चौकशीशिवाय थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची पद्धत बंद करणे.

१४/०१/२०२६ रोजीच्या १८ मोजणी प्रकरणांबाबतच्या परिपत्रकाचा रद्दबातल करणे.

प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतंत्र व पुरेसे मोजणी साहित्य (रोव्हर, लॅपटॉप, डाटा कार्ड इ.) उपलब्ध करून देणे.

शासकीय सुटीच्या दिवशी अपवाद वगळता कामकाज न करण्याबाबत सूचना देणे.

अन्यायकारक प्रतिनियुक्ती थांबवणे.

अतिरिक्त कामकाजाचा मोबदला नियमानुसार देणे.

जिल्हा अधीक्षक स्तरावरून सुरू असलेले नियमबाह्य वेतन वसुली आदेश थांबवणे.

आंदोलनाची रुपरेषा

१८/०२/२०२६ – मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून काळ्या फिती लावून केवळ कार्यालयीन कामकाज.

२०/०२/२०२६ पासून – मोजणी काम बंद ठेवून काळ्या फितींसह फक्त कार्यालयीन कामकाज.

२३ ते २६/०२/२०२६ – सामूहिक रजा आंदोलन.

२७/०२/२०२६ – जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे येथे आक्रोश मोर्चा व धरणे आंदोलन.

०२/०३/२०२६ पासून – मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण बेमुदत कामबंद आंदोलन.

राज्यभरातील सर्व भूमी अभिलेख कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर राज्य समन्वयक सुनील गोडसे, विभूतीचंद्र गजभिये, पवन केवटे, राहुल पाटील, किशोर इंगळे, दिपाली मुरकुटे, सुरज रामटेके, विवेक कोठाळे, कमलाकर पोतदार, संजय बोर्डे, अभय पाटील आणि धनाजी बाबर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT