परभणी

Illegal sand mining Parbhani | स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची अवैध रेती उत्खननावर धडक कारवाई

तीन ट्रॅक्टर एक जेसीबीसह 40.49 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

गंगाखेड : गंगाखेड तालुक्यातील पिंपरी-झोला नागठाणा येथील गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन सुरू होते. यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) परभणीच्या पथकाने धडक कारवाई केली. दरम्यान 3 ट्रॅक्टर, 1 जेसीबीसह 40 लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी म्हणून हेडकॉन्स्टेबल माणिक वाघ (स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, परभणी) यांनी तक्रार दिली आहे. तीन ट्रॅक्टर चालक-मालक व जेसीबी चालक-मालक यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पथक गंगाखेड हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली होती की, पिंपरी नागठाणा येथील गोदावरी नदीपात्रात जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैधरित्या रेती उत्खनन सुरू आहे.

या माहितीनुसार, पथकाने छापा टाकून संबंधित वाहने जप्त केली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, हेडकॉन्स्टेबल महेश कवठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे तसेच पोलीस कॉन्स्टेबल शरद सावंत, दिलीप निलपत्रेवार, हनुमान ढगे व हनवते यांनी सहभाग घेतला. अवैध रेती उत्खननाविरोधातील या कारवाईमुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे. अशा कारवाया येणाऱ्या काळात चालू राहतील काय?, गंगाखेड पोलीस मात्र या वाळू माफियाच्या विरोधात निर्णय घेतील काय? असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT