Parbhani robbery incident
जिंतूर : जिंतूर - परभणी मार्गावरील मुख्य व्यापारी परिसरात शुक्रवारी ९ मे च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तीन दुकाने फोडून सुमारे 06 लाख रुपयांच्या रोख रकमेसह वजनदार साहित्य आणि मौल्यवान वस्तू चोरी केल्या. ही घटना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तर पुर्णा येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ समोर उभी केलेली एक दुचाकी १० मे रोजी सकाळी १०:४५ ते ११:१५ वाजे दरम्यान चोरीला गेली आहे. शहरातील रहिवासी तथा रेल्वेचे गार्ड (रेल्वे कर्मचारी ट्रेन मॅनेजर) शेख मुनवर शेख अफजल यांनी १० मे रोजी सकाळी १०:४५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ४ जवळील रेल्वे स्टेशन मास्टर ऑफिसच्या खाली हिरो होंडा प्लस मोटारसायकल क्रमांक (एम एच ४४ ए १२७) ही उभी केली होती.थोड्या वेळांनी त्यांनी ११:१५ वाजता येवून पाहीले तर दुचाकी चोरीला गेल्याचे दिसून आले.त्यावरुन पूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
शहरातील परभणी रोड नेहमी नागरिकांनी गजबजलेला परिसर असतानीही मध्यरात्रीच्या काळोख्याचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी अतिशय धाडसीपणाने एकाच रात्री परिसरातील तब्बल तीन दुकाने फोडली. दुकानातील रोख रक्कम, संसारोपयोगी साहित्य व इतर वजनदार माल चारचाकी वाहनात भरून नेला. शहराच्या मुख्य रस्त्यावरच चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस अगदी योजनाबद्ध पद्धतीने शटर उचकटून दुकानांमध्ये प्रवेश केला.
यावेळी त्यांनी मौल्यवान वस्तू, इलेक्ट्रॉनिक साहित्य, व रोख रक्कम असा एकूण सुमारे 06 लाखांचा ऐवज चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. चोरीस गेलेला माल चारचाकी वाहनात भरून नेण्यात आल्यामुळे चोरट्यांनी पूर्वनियोजितरीत्या ही कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरी करण्यात आलेल्या प्रतिष्ठानमध्ये जे के मोटार गॅरेज, विठ्ठल ऍग्रो, प्रधान फर्निचर यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच सपोनि जाधव, बीट जमादार पठाण, लहाने हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
दुस-या घटनेत पुर्णा येथील रेल्वे स्थानकावरून ताडकळस येथील लाकडे यांची देखील दुचाकी चोरीला गेली होती. मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून स्थानिक पोलीस मात्र शोध लावण्यास असमर्थ ठरत आहेत. त्याच बरोबर मागच्या दोन महिन्यापुर्वी चांगेफळ येथील शेतकरी देवराव बुलंगे यांची भारतीय स्टेट बँकेतून १ लक्ष ९० हजार रुपये रोकड चोरी गेली होती.त्याचाही अद्याप शोध लागलेला नाही.
शिवाय,बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून देखील दोन महिलांची रोकड अज्ञात चोरट्यांनी रक्कम पळवली होती. अशा चोरीच्या घटना घडूनही त्यातील आरोपींना पकडण्यात यश आले नसल्यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. चोरट्यांवर पोलीसांचा वचक तथा अंकुश राहीला नसल्यामुळे चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.