Parbhani Jintur Road Accident Pudhari
परभणी

Parbhani Accident | एसटी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

जिंतूर तालुक्यातील मानधनी पाटीजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

Parbhani Jintur Road Accident

जिंतूर: जिंतूर तालुक्यातील जिंतूर–औंढा मार्गावरील मानधनी पाटीजवळ जिंतूर आगाराच्या एसटी बसच्या धडकेत एका पादचाऱ्याचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली.

या अपघातात मानधनी येथील रहिवासी ज्ञानेश्वर गंगाधर तळेकर (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. जिंतूर आगाराची एमएच २० बीएल १२८५ क्रमांकाची एसटी बस जिंतूर–औंढा मार्गावरून जात असताना बांधणी पाटी परिसरात पायी चालत असलेल्या तळेकर यांना बसने जोरदार धडक दिली.

अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात व ग्रामस्थांच्या मदतीने जखमी अवस्थेत तळेकर यांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वजित मोरे यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

मयत ज्ञानेश्वर तळेकर हे मानधनी गावचे रहिवासी असून ते अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. त्यांच्या अकाली व दुर्दैवी मृत्यूमुळे मानधनी गावासह परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे तसेच पोलीस जमादार यशवंत वाघमारे यांनी घटनास्थळ व ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जिंतूर आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण, स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवणे तसेच विभागीय वाहतूक अधिकारी प्रदीप सोळुंके यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली व माहिती घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT