मोहखेड तांडयात गांजाच्या शेतीत तब्बल १०९ झाड जप्त करण्यात आली  Pudhari Photo
परभणी

Parbhani ganja cultivation raid - जिंतूर तालुक्यातील मोहखेड्यात चक्क गांजाची लागवड, तब्बल १०९ झाडे जप्त

परभणी- जिंतूर तालुक्यातील मोहखेड्यात चक्क गांजाची लागवड, तब्बल १०९ झाडे जप्त

पुढारी वृत्तसेवा

१.२१ कोटीचा गांजाची शेती,अमली पदार्थ विरोधी पथकाची दबंग कार्यवाही

मोहखेड तांडयात गांजाची शेती उद्धवस्त

१.२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

तब्ब्ब २ क्विंटल ४२ किलो ३०० ग्रॅम वजनाची १०९ गांजाची झाडे जप्त

शेत ठोक्याने घेऊन लागवड केल्याचा आरोप

जिंतूर: जिंतूर तालुक्यातील मोहखेड तांडा परिसरात शेतात गांजाची लागवड केल्याचे आढळून आल्याने अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून तब्बल १०९ गांजाची झाडे जप्त केली. या झाडांचे एकूण वजन २४२ किलो ३०० ग्रॅम असून, त्यांची किंमत १ कोटी २९ लाख १५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी परमेश्वर रामा चांदणे (वय ३२, रा. मोहखेड तांडा, ता. जिंतूर) याच्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहखेड (ता. जिंतूर) येथील शेतकरी कैलास सखाराम राठोड यांच्या गट क्रमांक १६ मधील शेतजमीन परमेश्वर चांदणे याने ठोक्याने घेतली होती. त्याच्या ताब्यातील या शेतात गांजाच्या झाडांची लागवड करून त्यांची जोपासना करण्यात आल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.

गुप्त माहितीनंतर पथकाने संबंधित शेतात छापा टाकून पाहणी केली असता गांजाची झाडे आढळून आली. कारवाईदरम्यान एकूण १०९ झाडे जप्त करण्यात आली. या झाडांचे वजन २४२ किलो ३०० ग्रॅम असून, जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी २९ लाख १५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६४ / २०२६ नुसार एनडीपीएस कायद्यातील कलम ४ (ब), २० (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मोहखेड तांड्यातील शेतात गांजाची लागवड केलेल्या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केलेला मुद्देमाल व किंमत गांजाची झाडे 109, एकूण वजन 242 किलो, 300 ग्रॅम मुद्देमालाची किंमत 1,21,15,000 रुपये (1 कोटी 21 लाख 15 हजार) असा होता.

तपास शेतकरी कैलास राठोड यांच्या गट.नं.९६ मधील शेतजमीन परमेश्वर चांदणे यांने ठोक्याने घेतली होती. त्या शेतात गांजाची लागवड करून जोपासना केल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून 109 झाडे जप्त केली. अमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई मादक पदार्थाच्या विळख्यातून समाजाला वाचवण्यासाठी पोलीसांची मोहीम सुरूच राहणार: पोलीस प्रशासन

या कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी, अमली पदार्थ विरोधी पथकाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतप्रिया सिंग, पोलीस अधीक्षक अजित टिके, पोलीस अधीक्षक अनुज तारे आणि पोलीस उपअधीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

कारवाईत पोलीस निरीक्षक दिगंबर कोपरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन पवार, ए, पो.उ.नि.संतोष वावळ, हनुमंत जकवेवाड, पिराजी निळे, प्रशांत कोकंडे, काशिनाथ कुंडगीर, रोहित मगर, विकास तायडे, शंकर कोस्वेवाड, गणेश जाधव, महेंद्र दासरवार, तानाजी येळगे आणि शेख मुजीब यांचा सहभाग होता. अमली पदार्थाचा नायनाट करणे हेच आमचे ध्येय असल्याचा मानस." पथकातील पोलीस प्रशासनाने व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT