Parbhani News : हप्त्यापोटी शेतकऱ्याचे ट्रॅक्टर नेल्याने फायनान्स कंपनीला ठोकले टाळे File Photo
परभणी

Parbhani News : हप्त्यापोटी शेतकऱ्याचे ट्रॅक्टर नेल्याने फायनान्स कंपनीला ठोकले टाळे

'स्वाभिमानी'चे आंदोलन; शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

Parbhani Finance company locked for taking farmer's tractor

परभणी, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पाथरा येथील एका : शेतकऱ्याने फायनान्सवर ट्रॅक्टर घेतले होते. यापोटी त्याने संबंधित कंपनीकडे वेळोवळी सहा हप्त्यांचा भरणा केला, पण एक हप्ता थकीत झाल्याने कंपनी कर्मचाऱ्यांनी शेतातून ट्रॅक्टर ओढून नेण्याची कारवाई केली. यामुळे संतप्त झालेल्या त्या शेतकर्याने मंगळवारी (दि.२४) वसमत रोडवरील कार्यालयात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांनी वेळीच त्याला रोखल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी या फायनान्स कंपनीला टाळे ठोकून आंदोलन करत निषेध नोंदवला.

परभणी तालुक्यातील पाथरा येथील शाम साहेबराव काकडे या शेतकर्याने महिंद्रा अर्जुन ५५५ हे ट्रॅक्टर खरेदी केले. यासाठी त्यांनी महिंद्रा फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेले होते. ६ महिन्यांचा हप्ता होता. हे हप्ते शेतकर्याने सुरळीत भरले. तसेच सातवा हप्ता थकीत झाला.

एक हप्ता का थकला यासाठी त्या शेतकर्याचे ट्रॅक्टर कर्मचाऱ्यांनी शेतातून काम करताना ओढून नेले. नंतर १५ दिवसांपासून शाम काकडे पैसे घेऊन फायनान्स कंपनी कार्यालयात चकरा मारत आहेत, परंतु ते भरून घेण्यास टाळाटाळ केली. संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय ट्रॅक्टर मिळणार नाही, असे सांगण्यात येत होते.

जिल्ह्यात पावसाने मारलेली दांडी, शेतकऱ्यांसमोर आलेले दुबार पेरणीचे संकट यातच हे पैसे कसे जमा करायचे या विवंचनेत शेतकरी असताना दोन दिवसांपासून मी माझे जीवन संपवणार, असे तो शेतकरी घरी सांगत होता. यामुळे गावातील शेतकऱ्यांच्या मुलांनी त्यांचा रात्रभर सांभाळ करत मंगळवारी नागरिक त्या शेतकर्यांसह स्वाभिमानी संघटनेच्या कार्यालयात आले. नंतर हे सर्व जण शहरातील वसमत रोडवरील महिंद्रा फायनान्सच्या कार्यालयात गेले. तेव्हा अधिकारी ट्रॅक्टरचे पैसे भरून घेण्यास टाळाटाळ करत होते.

याचवेळी अचानक शाम काकडे यांनी दोरी आणून कार्यालयातील छताच्या पंख्याला बांधत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता त्याना सावरत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले. याची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी पैसे भरून घेत ट्रॅक्टर सोडून देतो म्हणून सांगितल्याने सायंकाळी पाच वाजता कुलूप उघडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT